Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिव्हील हॉस्पिटल परिसर बेकायदेशीर खोक्यावर हातोडा

सिव्हील हॉस्पिटल परिसर बेकायदेशीर खोक्यावर हातोडा


मा आयुक्त तथा सुनील पवार यांनी शहर,चौक रस्ते सुशोभीकरण, शहरा तील वाहतूक व्यवस्था सुधारिकरण ,
अतिक्रमण मुक्त  फुटपाथ इत्यादी गोष्टी करण्याचे नियोजन केले आहे,  त्यानुसार शहरातील बेकायदेशीर खोकी हटवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे , त्यानुसार अतिक्रमण विभाग यांना स्पष्ठपणे सूचना  दिलेल्या आहेत. आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये ६ खोकी  काढण्यात आली . पुढील कारवाई अध्याप चालू आहे. उपायुक्त वैभव साबळे आणि  अतिक्रमण टीम यांनी सदरची कामगिरी केली आहे .

अनेक वर्षांपासून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यावर  कारवाई करण्या बाबत वारंवार नागरिकांकडून  मागणी होत होती . शुक्रवार दिनांक २/२/२०२४ पासून महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर खोकी व महापालिकेत दिलेल्या परवान धारक यांनी प्रमाणापेक्षा जास्त वाढवलेले खोके काढण्याची कारवाई चालू केलेले असून यामध्ये आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये बेकायदेशीर बसलेले खोकी काढण्याची कारवाई करण्यात आली.

उप आयुक्त श्री वैभव साबळे ,पंडित पाटील यांनी नियोजनपूर्वक बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे, बेकायदेशीर खोकी काढून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी हठविलेली नव्हती , दि २/२-२०२४ पासून सदर खोक्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे, त्या नुसार या पुढे तिन्ही शहरात कारवाई होणार आहे.  नागरिकांकडून या कारवाई बाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.