'घर खरेदी करा आणि बायको फ्री मिळवा' विचित्र ऑफरमुळे उडाली खळबळ
नवी दिल्ली : कोणतीही वस्तू, गोष्ट विक्री करताना विक्रेते वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती करतात. जेणेकरुन ग्राहक त्यांच्याकडे आपोआप चालून येतील. हटके मार्केटिंग करुन लक्ष वेधून घेण्याची स्टॅटर्जी करुन लोक आपलं काम चालवतात.
तुम्ही आत्ता पर्यंत अशा अनेक निरनिराळ्या प्रकारच्या जाहिराती पाहिल्या असतील. मात्र सध्या एक जाहिरात सर्वांचं अधिक लक्ष वेधून घेत आहे. जाहिरात करण्याची त्यांची पद्धत पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल. एका घराची जाहिरात सध्या चांगलीच व्हायरल होतेय. ही जाहिरात अशी होती की, 'घर खरेदी करा आणि मोफत बायको घ्या'. जाहिरातीची ही टॅग लाइन पाहताच लोकही संभ्रमात पडले नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?
खरंतर, चीनच्या रिअल एस्टेट कंपनीनं ही जाहिरात काढली होती. चीनमध्ये रिअल एस्टेटवाल्यांची परिस्थिती हालाकिची सुरु असून त्यांनी अधिक कमाई होण्यासाठी, ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. ही शक्कल एवढी व्हायरल झाली की सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ही जाहिरात व्हायरल होताच अनेकांनी त्याविषयी तक्रार दाखल केली. कंपनीला अशी विचित्र जाहिरात करण्याविषयी 3 लाख रुपये भरावे लागले.
चीनमधील सर्वात मोठी रिअल एस्टेट कंपनी Evergrande ची परिस्थीत बिकट झालीय. याचा परिणाम इतर एस्टेट कंपनींवरही पहायला मिळाला. रिअल एस्टेट वाल्यांची बिझनेस ठप्प होत असल्यानं चीनमधील लोक वेगवेगळ्या कल्पना लढवत ग्राहकांचं लक्ष वेधतायेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.