Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरावर लिंबू, बाहुली... ठाकरे गटाच्या महिला पदाधिका-यांचा भानामतीचा दावा, पाेलिसांत धाव

घरावर लिंबू, बाहुली... ठाकरे गटाच्या महिला पदाधिका-यांचा भानामतीचा दावा, पाेलिसांत धाव


सांगली जिल्ह्यातील मिरज येथे उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या  महिला पदाधिका-यावर भानामतीचा प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेनेच्या महिला नेत्याने सखाेल चाैकशीची मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यातील महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सरोजिनी माळी यांच्या घरासमोर आज भानमतीचा प्रकार घडला आहे. माळी यांच्या घराच्या गेटवर लिंबू, बाहुली, नारळ, हळदी, कुंकू टोचलेल्या सुई असे साहित्य असलेली पिशवी ठेवण्यात आली हाेती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर माळी यांनी सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांनाही दिली.

मनीषा पाटील म्हणाल्या शिवसेना उद्धव ठाकरे महिला पदाधिका-यांचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार करण्यात आला आहे. हा जादूटोणा करण्याचा प्रकार काेणी केला त्याचा शोध घेऊन कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील महिला जिल्हा प्रमुख मनीषा पाटील यांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.