मधुचंद्राच्या रात्रीच नवरदेवानं खाल्ल्या सेक्सवर्धक गोळ्या, नववधूची बिघडली तब्येत अन् झाला मृत्यू
लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सवर्धक गोळ्या खाऊन नवरदेवाने नववधूशी शारीरिक संबंध केले. यानंतर तरुणीची प्रकृती बिघडली व लग्नाच्या सातव्या दिवशीच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, सामूहिक बलात्काराप्रमाणे तिच्याशी शारीरिक संबंध केले गेले. उत्तरप्रदेश राज्यातील हमीरपूर येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे. सात दिवसापूर्वी येथील एक तरुणाचा विवाह झाला होता. लग्नाच्या पहिल्या रात्रीच तरुणाने सेक्स वर्धक गोळ्या खाल्या. सेक्स वर्धक गोळ्या खाऊन पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध केले आणि आपल्या वासनेपायी नववधूला गंभीररित्या जखमी केले. दुसऱ्या दिवशी नववधूची प्रकृती बिघडली व तिला उलट्या होऊ लागल्या.
तरुणीने आपली तब्येत बिघडल्याची माहिती माहेरच्या लोकांना दिली. ७ फेब्रवारी रोजी पीडितेला उपचारासाठी कानपूरमधील रुग्णालयात दाखल केले गेले. तेथे उपचारादरम्यान १० फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टमनंतर सोमवारी मृतदेह घरी आणल्यानंतर खळबळ माजली. पीडितेच्या भावाने सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला.
पीडितेला आई-वडील नव्हते. भाऊ सरकारी नोकरीला आहे. त्यानेच बहिणीचे लग्न लावून दिले होते. चार फेब्रुवारी रोजी तरुणीचा विवाह झाला होता. तरुणीच्या वहिणीने सांगितले की, सात फेब्रुवारी रोजी ती आपल्या पतीसोबत विवाहाच्या विधींमध्ये भाग घेण्यासाठी कानपूरला गेली. त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांचा फोन आला की, त्यांनी तरुणीचा आजार लपवून तिचे लग्न लावून दिले आहे. तिला उलट्या होत आहेत व तिची प्रकृती खूप खालावली आहे. त्यानंतर तरुणीचा भाऊ व वहिनी तिच्या सासरी गेले व तिला कानपूरमधील एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार केले मात्र दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला.
मृत नववधूच्या वहिनीने सांगितले की, तब्येत बिघडल्याची माहिती तिने फोनवर तिला होती. त्याचबरोबर सांगितले होते की, तब्येत का बिघडली आहे. नववधूच्या बहिनीने सांगितले की, तिच्या पतीने सेक्स वर्धक गोळ्या खाऊन संबंध केले. त्यामुळे तिची तब्येत बिघडली. त्यानंतर तरुणीला गायनोकोलॉजिस्टला दाखवले. चेकअप केल्यानंतर गायनोकोलॉजिस्टने सांगितले की, तरुणीसोबत असे शारीरिक संबंध ठेवले आहेत जसे सामूहिक बलात्कार करावा. तरुणीच्या गुप्तांगात अनेक जखमा झाल्या होत्या. त्याचे इंफेक्शन झाल्याने तिचा मृत्यू झाला. अजूनपर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.