Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दलालांनी मांडला वासनेचा बाजार, आधी वेबलिंक आणि फोटो, नंतर लॉज...

दलालांनी मांडला वासनेचा बाजार, आधी वेबलिंक आणि फोटो, नंतर लॉज...

एका लॉजमध्ये सेक्स रॅकेट  चालवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरून तीन महिलांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. लॉजवर चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटप्रकरणी आत लॉजच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. 

बनावट ग्राहक

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'नवी मुंबईमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहकाला त्या लॉजवर पाठवण्यात आले.  त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी नेरुळमधील शिरवणे येथील राज इन लॉजिंग अँड बोर्डिंगच्या आवारात छापा टाकला.

तीन महिलांना आश्रय

पोलिसांनी छापा टाकताच लॉज मॅनेजरसह तीन दलालांनाही ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांना तीन महिलाही घटनास्थळी मिळाल्यानंतर त्यांना आश्रय देण्यात आला आहे. यावेळी महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे सांगितले. 

व्हॉट्सॲपद्वारे वेश्याव्यवसाय

अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी याप्रकरणाची धक्कादायक माहिती सांगितली. यावेळी ते म्हणाले की, एजंट वेबलिंक आणि व्हॉट्सॲपद्वारे ग्राहक शोधत होते, त्यावरूनच त्यांना महिलांचे फोटो पाठवणे आणि पुढील व्यवहार ठरवण्याचा धक्कादायक प्रकार हे दलाल करत होते.

सोशल मीडियाचा गैरवापर

महिलांचे फोटो पाठवून व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना लॉजमध्ये रूम बुक करण्यास सांगण्यात येत असे. त्यामुळे हा प्रकार त्यांच्यावर धाड टाकताना पोलिसांनी वापरला. त्यानंतर तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल करून लॉज मालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.