Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुर्दैवी.! लग्नासाठी स्माइल डिझाइन करणं पडलं महागात. तरूणाने गमावला जीव

दुर्दैवी.! लग्नासाठी स्माइल डिझाइन करणं पडलं महागात. तरूणाने गमावला जीव

हैदराबादच्या जुबली हिल्स येथील एका क्लिनिकमध्ये २८ वर्षीय तरुणाची दातांच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची अजब घटना समोर आली आहे.लक्ष्मी नारायण विंजाम असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांनी एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिक विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकवर आयपीसीच्या कलम ३०४A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

१६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.मृत तरुणाच्या दातांच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याला भूल देण्यात आली.मात्र, देण्यात आलेल्या भुलीच्या औषधाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तरुणाचे भान हरपले आणि त्याचा मृत्यू झाला, असा आरोप मृत तरुणाचे वडील विंजाम रामुलू यांनी केला.मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मी नारायण हा एकटाच 'स्माइल डिझायनिंग' शस्त्रक्रियेदरम्यान क्लिनिकमध्ये गेला होता.

त्यावेळी संध्याकाळी तरुणाचे वडील रामुलू यांनी त्याला फोन केला.मात्र, हा कॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि उत्तर दिले की, त्यांचा मुलगा शस्त्रक्रियेदरम्यान बेशुद्ध पडला होता.क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी दावा केला की, तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तक्रारदार रामुलू यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, आमचे कुकटपल्ली जवळील हैदरनगर येथे घर आहे.माझ्या मुलाने ट्रीटमेंटसाठी जेव्हा घर सोडले तेव्हा तो पूर्णपणे बरा होता. त्याला कोणत्याही आरोग्याच्या समस्या न्हवत्या.डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व घडले असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, पोलिसांनी डेंटल क्लिनिकवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे आम्ही क्लिनिकमधून वैद्यकीय रेकॉर्ड जप्त केले आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहोत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.