Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली! प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी वृद्ध आजीलाच संपवलं, आईचीही मुलांना गुन्ह्यात साथ

सांगली! प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी वृद्ध आजीलाच संपवलं, आईचीही मुलांना गुन्ह्यात साथ

सांगली : पैशांचा मोह माणसाला हैवान बनवू शकतो. भरपूर पैसे मिळवा, झटपट पैसे मिळवा अशा मोहापायी लोक नको ते काम करून बसतात, काहीवेळा आर्थिक नुकसान होते, तर काही वेळा अशी परिस्थिती उद्भवते की संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होतं.

अशीच एक दुर्दैवी घटना सांगलीत घडली आहे, जिथे प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनीच त्यांच्या वयोवृद्ध आजीचा जीव घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या भयानक कृत्यामध्ये त्यांच्या आईनेच त्यांची साथ दिली आणि तिच्या वयोवृद्ध सासूला संपवलं. नातवांनी वृध्द आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना खानापूर तालुक्यातील पारे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी मृत महिलेचे दोन नातू आणि सून यांना अटक केली. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे, त्याचे नाव उघड केलेलं नाही. त्यासह पोलिसांनी दुसरा नातू आशिष सतीश निकम, सून सौ. रेणुका सतीश निकम अशा तिघांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचणी येथील सतीशशेठ निकम यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांची विटा, चिंचणी (मं.) यासह विविध ठिकाणी प्रॉपर्टी आहे. यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची पारे येथील बहीण संगिता रामचंद्र साळुंखे यांनी भाऊ सतीश यांना सांगितले होते. त्याचा राग संशयित सून सौ. रेणुका, नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ यांना होता.

त्यामुळे हा राग मनात धरून संशयित आरोपीं 19 फेब्रुवारी रोजी संगिता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी गेले. तू तूझ्या भावाला बोलावून घेऊन 48 तासांच्या आत सदर प्रॉपर्टी फिरवून दे, नाहीतर तुला व म्हातारीला (सखुबाई) यांना 48 तासानंतर दाखवितो, अशी धमकी देऊन हे तिघेही विट्याला निघून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हे तीघेही सतीश यांची बहीण संगिता यांच्या पारे येथील घरी गेले. त्यावेळी सखुबाई या मुलगी संगिताच्या घरी होत्या. या तिघांनी पुन्हा त्याठिकाणी वाद घालण्यास सुरूवात केली.

त्यानंतर आरोपींनी आजी सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला. त्यानंतर हे तीघेही आरोपी त्यांच्या विटा येथील घरी आले. या घटनेची माहिती मिळताच उपअधिक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून सखुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी विटा पोलीसांनी मयत सखुबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका निकम या तिघांना रात्री उशिरा अटक केली. या घटनेची विटा पोलीसांत नोंद झाली असून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.