माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा मृत्यू; त्यांच्याच नावाच्या रुग्णालयात झाला अंत
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी संथनचा बुधवारी (28 फेब्रुवारी) मृत्यू झाला. चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी संथनने अखेरचा श्वास घेतला. सकाळी 7.50 वाजता संथनचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे संथानने ज्यांना मारले, त्यांच्याच नावाच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून यकृत निकामी झाल्याने 55 वर्षीय संथन आजारी होता. 27 जानेवारी रोजी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होता. त्यामुळे त्याला राजीव गांधी सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. राजीव गांधी हत्येप्रकरणी संथनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली.
11 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 6 दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नलिनी, श्रीहरन, संथन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तब्बल 32 वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली. नलिनी आणि रविचंद्रन यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.
परंतु उर्वरित चौघांना मध्यवर्ती कारागृहातील विशेष शिबिरात ठेवण्यात आले होते. हे चौघेही श्रीलंकेचे नागरिक असल्याने असे करण्यात आले होते. दरम्यान, तमिळनाडूतील दहशतवादी संघटना Liberation Tigers of Tamil Eelam (LTTE) यांनी कट रचून राजीव गांधींची हत्या केली होती. संथान एप्रिल १९९१ मध्ये श्रीलंकेवरुन तमिळनाडूमध्ये आला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.