आज दिल्लीत शेतकरी मोर्चा; राजधानीत कडेकोट पोलीस बंदोबस्त
नवी दिल्ली : शेतकरी मोर्चा विविध मागण्यासाठी आज दिल्लीत धडकणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे.
शेतकरी हे त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत. चंदीगड येथे शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत सोमवारी (12 फेब्रुवारी) बैठक पार पडली. पण यात कोणताही निर्णय न झाला नाही. यानंतर शेतकऱ्यांनी आज सकाळी 10 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
शेतकरीसोबत झालेल्या बैठकीत एमएसपी विषयचा कायदा, कर्जमाफीच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोल करत आहेत. या सर्व मागण्या शेतकऱ्यांनी यापूर्वी केल्या होत्या. पण शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याच निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या सीमेवर कलम 144 लावण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.