Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीचे डोके हातोड्याने ठेचून मुलाला केला व्हिडीओ कॉल

पत्नीचे डोके हातोड्याने ठेचून मुलाला केला व्हिडीओ कॉल


छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुकुंदवाडी परिसरात पतीने झोपेतच पत्नीचा गळा आवळून आणि त्यानंतर हातोडीने डोक्यात 12 गाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. लीला निवृत्ती नाफडे असे या मृत महिलेचे नाव असून आरोपी निवृत्ती नाफडेला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेटले आहे.

आरोपी पती व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता परंतु काही दिवसापूर्वी ती कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली त्यामुळे आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावात असलेल्या पतीने मध्यरात्रीत पत्नीचा झोपेतच खून केला. आणि त्यानंतर आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून पत्नीचा मृतदेह दाखवला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कंपनी बंद पडल्यानंतर आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे कृष्णा निवृत्ती नाफडे यांची मानसिक संतुलनही बिघडले होते. त्यांनी गाढ झोपेतच पत्नी लीला यांची हत्या केली. हत्येनंतर तासभर ते मृतदेहाजवळ बसून होते. तर पहाटे साडे चारच्या सुमारास मुलाला व्हिडीओ कॉल करत पत्नी लीला यांचा मृतदेह दाखवला.


मुलाला व्हिडीओ कॉल करून बघ, मी तुझ्या आईला संपवलं असं त्यांनी सांगितलं. कृष्णा हे व्हिडीओकॉन कंपनीत कामाला होते. कंपनी बंद पडल्यानंतर त्यांना पैसेही मिळाले होते. मात्र ते पैसे संपले. कृष्णा यांचा लहान मुलगा बीएएमएसचं शिक्षण घेत आहे तर मोठी मुलगी विवाहित असून ती ठाण्यात राहते. कंपनी बंद पडल्यानंतर कृष्णा यांच्या वागण्यात बदल झाला होता. शेतातूनही फारसे उत्पन्न मिळत नव्हते. आत्महत्येचाही विचार अनेकदा बोलून दाखवला होता.

पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार करत खून केला. हातोडीने वार करण्याआधी गळा दाबल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच हातोडीने एक तास वार करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही समोर आलीय. पत्नीच्या हत्येनंतर कृष्णा यांनी स्वत:च्या गळ्यावरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.