रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण; पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर ठेवली नजर !
सांगली : रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील ताब्यात घेतलेल्या संशयित शशांक ऊर्फ सोनू धनंजयकुमार सिंग (सोनपुरा, जि. सदरसा, बिहार) आणि एसपी ऊर्फ अनिल सोहनी (जिंदाल साँ लिमिटेंड, मुंद्रा, गुजरात) दोघांची कसून चौकशी सुरू आहे. दरोड्यानंतर परराज्यात पलायन करण्यासाठी सांगली जिल्हा निवडल्याचे चौकशीत समोर आले आहे. तसेच विश्रामबाग पोलिसांच्या प्रत्येक हालचालींवरही नजर ठेवल्याचे समोर आले आहे. पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
जूनमध्ये मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला होता. एसपी ऊर्फ अनिल सोनी याने पेढीत शिरताच पोलिस असल्याची बतावणी केली होती. कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांना एका ठिकाणी येण्यास सांगितले होते, असे तपासातून समोर आले आहे.
शशांक सिंग्ने कारागृहातून दरोड्यावर नियंत्रण ठेवले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असून कसून चौकशी केली जात आहे. विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे चौकशी करत आहेत. परराज्यात पलायन करण्यासाठी सोईचा मार्ग म्हणून त्यांनी सांगली जिल्हा निवडला होता अशीही माहिती पर्पोलिस तपासात समोर आली आहे. तसेच पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवली होती. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यासाठी अनेक आव्हाने पोलिसांसमोर आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.