Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पतीच्या निधनानंतर सासऱ्याच्या प्रेमात पडली सून; मग घडलं असं की पोलिसांत पोहोचले

पतीच्या निधनानंतर सासऱ्याच्या प्रेमात पडली सून; मग घडलं असं की पोलिसांत पोहोचले

पाटणा : असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं. यात जोडप्यांना त्यांच्या प्रेमापलीकडे काहीही दिसत नाही. त्यांच्यापुढे कोणतीही मर्यादा नसते, कोणतंही बंधन नसतं किंवा ते वयही बघत नाहीत. ते फक्त प्रेम करतात. एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. शेवटी त्यांच्या प्रेमापुढे जगाला झुकावं लागतं. असाच एक प्रकार बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात समोर आला आहे.

रविवारी 4 फेब्रुवारीला गोपाळगंजमधील भोरे पोलीस स्टेशनमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली होती. यात एक जोडपं एकमेकांशी लग्न करण्यावर ठाम होतं. त्यांना काही लोक विरोध करत होते. ही महिला चार मुलांची आई असल्याचं समोर आलं. तिच्या पतीचं सहा महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यानंतर ती आपल्या चुलत सासऱ्यावर प्रेम करू लागली. यानंतर त्यांनी समाजाची पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण नेहमीप्रमाणे समाज आणि कुटुंब त्यांच्या प्रेमाचे शत्रू बनले. ते त्यांच्या नात्याच्या विरोधात गेले.

समाजाचा धाक दाखवून कुटुंबीयांनी महिलेला या लग्नापासून रोखण्यास सुरुवात केली. काही वेळातच प्रकरण इतकं वाढलं की लोकांना पोलीस ठाण्यात यावं लागलं. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही दोघांना खूप समजावलं. पण जेव्हा या जोडप्याने एकमेकांना सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांना पोलीस ठाण्यातच लग्न करण्यास भाग पाडण्यात आलं. पोलीस ठाणे प्रभारींच्या उपस्थितीत दोघांनी पोलीस ठाण्यात बांधलेल्या मंदिरात एकमेकांना पुष्पहार घातला.


मिळालेल्या माहितीनुसार, गोपलागंज जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीतील दुबवलिया गावातील तरुणाचा सहा महिन्यांपूर्वी ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांची पत्नी सीमा देवी विधवा झाली. त्यांना चार मुले आहेत. आता त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी महिलेच्या एकटीच्या खांद्यावर आली. ती स्वतःही एकाकी झाली. तिच्या दु:खाच्या काळात तिचा चुलत सासरा तुफानी देवदूताप्रमाणे आला. त्याने मुलांची आणि त्यांच्या आईची काळजी घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या गरजा पूर्ण करू लागला. हे पाहून सीमा त्याच्या प्रेमात पडली.

सीमा आणि तुफानीच्या नात्याची बातमी गावात वणव्यासारखी पसरली. याला घरच्यांनी विरोध सुरू केला. त्यांनी कोणाचंही न ऐकल्याने लोकांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलिसांनी समजावूनही दोघांनी न ऐकल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात फुलांचे हार आणि सिंदूर लावून मंदिरासमोर लग्न लावून दिलं गेलं. महिलेचे सासरे तुफानी साह यांनी सांगितलं की, दोघे गेल्या एक महिन्यापासून प्रेमसंबंधात होते. सीमासोबत लग्न करून ते खूप खूश आहेत. असं केल्याने सीमाप्रमाणे त्यालाही नवजीवन मिळालं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.