Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इटलीमध्ये प्रॉपर्टी.. एकही कार नाही ! इतक्या कोटींच्या मालकीण आहेत सोनीया गांधी

इटलीमध्ये प्रॉपर्टी.. एकही कार नाही ! इतक्या कोटींच्या मालकीण आहेत सोनीया गांधी 

काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी दाखल केली आहे. सोनियांची प्रकृती पाहता त्या रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे त्या राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत जाणार आहेत. सोनिया गांधी यांची नेमकी संपत्ती किती आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

सोनिया गांधी यांच्याकडे किती मालमत्ता आहे?

सोनिया गांधी यांच्याकडे एकूण 12.53 कोटी रुपयांची संपत्ती आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत पाच वर्षांत 72 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 11.81 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी, राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सोनियांनी इटलीतील आपल्या वडिलांच्या संपत्तीत आपला वाटा असल्याचे नमूद केले आहे. तेथील वडिलोपार्जित संपत्तीत त्यांचा वाटा आहे.



मागील 5 वर्षातील आयकर रिटर्नमध्ये दाखवलेले उत्पन्न

2018-19 या आर्थिक वर्षात 10.23 लाख
2019-20 मध्ये 10.57 लाख
2020-21 मध्ये 09.90 लाख
2021-22 मध्ये 10.68 लाख
2022-23 मध्ये 16.69 लाख

5 वर्षात जमीन कमी झाली

सोनियांकडे 88 किलो चांदी, 1267 ग्रॅम सोने आणि दागिने आहेत. तर 2019 मध्ये सोनियांनी दिल्लीजवळील डेरमंडी गावात तीन बिघे आणि सुलतानपूर मेहरौलीमध्ये 12 बिघे जमीन जाहीर केली होती, मात्र यावेळी दिलेल्या शपथपत्रात 12 बिघा जमिनीचा उल्लेख नाही. नवी दिल्लीच्या डेरामंडी गावात त्यांच्याकडे अजूनही तीन बिघा शेतजमीन आहे, ज्याचे एकूण बाजार मूल्य 5.88 कोटी रुपये आहे.

सोनियांकडे स्वतःची कार नाही

सोनिया गांधींकडे स्वतःची एकही गाडी नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी माझ्याकडे दुचाकी किंवा चारचाकी नसल्याचे सांगितले होते.

पुस्तकांची रॉयल्टी मिळते

सोनिया गांधी यांचे पेंग्विन बुक इंडिया, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, आनंदा पब्लिशर्स आणि कॉन्टिनेंटल पब्लिकेशन्स यांच्याशी करार आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून १.६९ लाख रुपयांची रॉयल्टी मिळाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

किती केसेस प्रलंबित आहेत ?

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांच्यावर खटला प्रलंबित आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, कलम 420, 120B, 403, 406 अंतर्गत प्रकरण नवी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात प्रलंबित आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.