Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाढदिवसाची मस्ती बेतली जीवावर, मारहाणीत मित्राचाच केला निर्घृण खून

वाढदिवसाची मस्ती बेतली जीवावर, मारहाणीत मित्राचाच केला निर्घृण खून

जालना शहरातील छत्रपती संभाजी नगर रोडवर असलेल्या आदर्श पॅलेस हॉटेलमध्ये शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी रात्री जालन्यातील बदनापूर तालुक्यातील नानेगाव-बदापूर येथील काही मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. त्यातील विठ्ठल सोळंके याचा वाढदिवस असल्याने जोरदार पार्टी चालू होती. पार्टी सुरू असताना छोटासा वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. मागे झालेल्या कुरबुरीच्या कारणावरून एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली,आणि चिडलेल्या अरुण श्रीसुंदर याने नवनाथ गोपीचंद कुलभये याच्या पोटात चाकुचे वार केले. चाकूचा हल्ला होताच एकच हलकल्लोळ उडाला.

चाकू हल्यात रक्तबंबाळ झालेल्या नवनाथ यास तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण तो पर्यंत त्याने प्राण सोडला होता. छातीमध्ये आणि पोटात वार झाल्याने घटनास्थळी रक्ताचा सडाच सडा पडलेला दिसून येत होता. नवनाथ गोपीचंद कुलभये (26) रा. बदापुर ता. बदनापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अरूण श्रीसुंदर असे आरोपीचे नाव आहे. दोघे एका ट्रान्सपोर्ट मध्ये चालकाची नौकरी करत होते.आज दोघांच्या मित्राचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी हाॕटेल आदर्श पॕलेस येथे हे सगळे मित्र जमल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जखमी नवनाथ यास जखमी अवस्थेत तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.


घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस निरीक्षक पाटील,पोलीस उपनिरीक्षक सानप, पोलीस उपनिरीक्षक कांबळे,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पोहार,सहायक निरीक्षक सय्यद अफसर, गवई, पो.हेड कॉन्स्टेबल वाघ,पो.हेड कॉ.देशमुख, चालक हिवाळे यांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला असून पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे. वाढदिवस साजरा करत असताना किरकोळ कारणावरून हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. घटनेचा अधिक तपास चंदनझीरा पोलीस करत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.