अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची उचलबांगडी; डॉ. एस. एस. मोरे सीपीआरचे नवे अधिष्ठाता
कोल्हापूर : सर्जिक साहित्य खरेदीतील गोलमाल, औषध पुरवठ्याचा परवना नसतानाही न्यूटन एंटरप्रायजेसकडून औषध खरेदी या प्रकरणात चर्चेत आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची शुक्रवारी उचलबांगडी केली.
वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील शल्यचिकित्साशास्त्र प्राध्यापक येथील मूळ पदावर डॉ. गुरव यांची बदली करण्यात आली असून, सीपीआरच्या अधिष्ठाताची अतिरिक्त जबाबदारी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचे बालरोग चिकित्साशास्त्र प्राध्यापक डॉ. एस. एस. मोरे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आल्याचा शासन निर्णय सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी जारी केला आहे.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयास (सीपीआर) बनावट परवान्याच्या आधारे औषधे पुरवठा केल्याबद्दल कोल्हापुरातील न्यूटन एंटरप्रायजेस या वितरकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे अन्न व औषध प्रशासनाने सीपीआरला दिले होते. तरीदेखील अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.