एक महिला, दोन पुरुष आणि मायाजाल; काम-धंदा न करता जगायला लागले रॉयल लाईफ! यात डॉक्टरही फसले
सोशल मीडियाचे जितके फायदे, तितकेच तोटेही आहेत. त्यामुळे त्याचा वापर डोळसपणे करणं गरजेचं असतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, अफरातफरी झाल्याचे अनेक प्रकारही समोर आले आहेत.
त्यातच आता दिल्लीमध्ये सोशल मीडियाद्वारे फसवणुकीचं एक वेगळं प्रकरण उघड झालंय. एका ऑनलाइन डेटिंग अॅपच्या माध्यमातून एक महिला व दोन पुरुषांनी अनेकांची फसवणूक केली व भरपूर पैसा कमावला. एका डॉक्टरनं दिलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघड झालं.
दिल्लीत गाझियाबादमध्ये काही बेरोजगार व्यक्ती कोणताही नोकरी-धंदा न करता लखपती बनल्या. पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल झाली तेव्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यांचं रॅकेट उघड करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रयत्न करत आहेत.
लोकांना फसवून जाळ्यात ओढणं व त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं या आरोपाखाली गाझियाबाद जिल्ह्यातल्या इंदिरापुरम पोलिसांनी वसुंधरा कॉलनीतली एक महिला व दोन पुरुषांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त (ट्रान्स हिंडन) निमिष पाटील यांनी शनिवारी (17 फेब्रुवारी) सांगितलं, की शुक्रवारी (16 फेब्रुवारी) आरोपींना अटक करण्यात आली. डेटिंग अॅपचा उपयोग करून ते तिघं अनेकांपर्यंत पोहोचत होते. त्यानंतर त्यांच्यातली महिला ग्राहकाला भेटायची व व्हिडिओ क्लिप शूट करायची. तिचा वापर करून त्या ग्राहकाला ब्लॅकमेल केलं जायचं व पैसे लुटले जायचे.पोलिसांनी सांगितल्यानुसार, या आरोपींनी लोकांकडून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खंडणीपोटी वसूल केली आहे. एका डॉक्टरच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, त्या टोळीतले आणखी दोन आरोपी फरार आहेत. तक्रारदार डॉक्टरही त्यांच्या जाळ्यात फसले होते. प्रकरण हाताबाहेर गेलं, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.भारतात अशी अनेक डेटिंग अॅप्स कार्यरत आहेत. त्यात सगळ्यात लोकप्रिय टिंडर अॅप आहे. सुरुवातीला ते फारसं लोकप्रिय नव्हतं. कारण त्यात हाय-प्रोफाइल व्यक्ती जास्त होत्या. आता टिंडरवर अनेक भारतीय युझर्स आहेत. बंबल आणि ट्रूली मॅडली हीदेखील लोकप्रिय डेटिंग अॅप आहेत. फेसबुकनंही आता डेटिंगकरिता वेगळी सुविधा दिलेली आहे.
अशा डेटिंग अॅपच्या माध्यमातून बनावट युझर्स फसवण्याची दाट शक्यता असते. अशा ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल होत असतात. त्यामुळे ऑनलाइन माध्यमातल्या या धोक्यांची जाणीव ठेवूनच त्याचा वापर केला पाहिजे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.