Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'कुणीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याला पाठीशी घालणार नाही' कोल्हापुरातुन अजित पवारांचा गुंडांना सज्जड दम

'कुणीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याला पाठीशी घालणार नाही' कोल्हापुरातुन अजित पवारांचा गुंडांना सज्जड दम

कोल्हापुर :  गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुंडांना चांगलाच दम दिला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनादेखील राजकीय दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

महायुतीकडून राज्यात अनेक विकास कामे सुरू आहेत. मात्र, विरोधकांकडून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काही गोष्ट घडत आहेत त्या मी नाकारत नाही. परंतु त्याचा तपास तिथल्या तिथे कसा होईल या दृष्टीने महायुती सरकारचा प्रयत्न आहे.

'कोणीही मोठ्या बापाचा असला, कोणीही सत्ताधारी पक्षाचा असला तर त्याला पाठीशी महायुती सरकार घालणार नाही. कायदा आणि संविधान सर्वात श्रेष्ठ आहे. महायुती सरकार संविधान आणि घटनेचा आदर करूनच सर्वांना न्याय देईल. घटनेचा आणि संविधानाचा आदर करूनच महायुतीचे सरकार पुढे नेणार', असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

पवार म्हणाले, पोलिसांनी आणि पोलीस खात्याने गुण्यागोविंदाने काम करावे. राजकीय हस्तक्षेप होत असतील तर राजकीय दबावाला बळी न पडता, कोणाच्याही दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतीला बळी न पडता काम करावे. समाजातील आपल्या लेकी बहीणी आणि आईला उजळ माथ्याने समाजात फिरता आलं पाहिजे. तिला सुरक्षित वाटले पाहिजे. या दृष्टीने काम करण्याच्या सूचना अजित पवारांनी पोलिस प्रशासनाला दिल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.