Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुचाकीवरून बॅग लंपास करणाऱ्यास अटक ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई

दुचाकीवरून बॅग लंपास करणाऱ्यास अटक ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई


सांगली :  दुचाकीवरून धूम स्टाईलने येऊन मोपेडला अडकवलेली बॅग लंपास करणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक दुचाकी, सोन्याचे मंगळसूत्र, पर्स असा ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. 

साहिल सलीम शेख (वय २७, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी चेन स्नॅचर तसेच बॅग लिफ्टिंग करणाऱ्यांना अटक करण्याच्या सूचना विश्रामबाग पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार विश्रामबागचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. 

बॅग लिफ्टींग करणाऱा एक संशयित धामणी रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती पथकातील आर्यन देशिंगकर यांना खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. संशयित तेथे आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने जानेवारीमध्ये एका मोपेडला अडकवेली पर्स लंपास केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरीचे मंगळसूत्र, पर्स असा मुद्देमाल करून त्याला अटक केली. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक तानाजी कुंभार, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, संकेत कानडे, शिवाजी ठोकळ, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.