मनोज जरांगे आता मोठ्या अडचणीत, कोर्टाने दिला मोठा दणका
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सदावर्ते यांनी याचिकेत केली होती.
या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमुर्ती अजय गडकरी, न्यायमुर्ती श्याम चांडक यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी मनोज जरांगे पाटील यांचे वकील आणि याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यात खडाजंगी झाली. मनोज जरांगे पाटील यांचे वकील थोरात यांनी युक्तिवाद करताना मुंबईत आंदोलन झालं नाही त्यामुळे सदावर्ते यांची याचिका निकाली काढा असं म्हटलं. तर सदावर्ते यांनी म्हटलं की, सोलापूरच्या पंढरपुरात झालेल्या मृत्यू प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना आरोपी करा हा त्या याचिकेतील मुद्दा बाकी आहे. यावर कोर्टानं सदावर्ते यांना प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यास सांगीतले.
आंदोलनाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. जागोजागी होत असलेल्या रास्ता रोको, जाळपोळ यामुळे जनजीवन विस्कळित होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे शेतकरी, विदयार्थी प्रभावित झाले. रस्ता जाम झाल्याचा मलाही फटका बसला. एसटी बंद, आरोग्य सेवा प्रभावित, समृद्धी महामार्गही बंद केला होता असं सदावर्तेंनी न्यायालयात म्हटलं. यावर जरांगेंच्या वकिलांनी सदावर्तेंच्या आरोपांना आधार नाही, पुरावा नाही आणि त्यामुळे कोर्टानं याचिका स्विकारू नये असं म्हटलं.याआधी झालेल्या सुनावणीत मनोज जरांगे पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत ? आंदोलन हिसंक होणार नाही? आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर याची जबाबदारी ते घेणार का ? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का ? या सर्व मुद्यांवर मनोज जरांगे पाटिल यांचे वकिल भूमिका स्पष्ट करणार होते. दरम्यान, गेल्या सुनावणीत आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल, जरांगेंचे वकिल विजय थोरात यांनी हमी दिली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.