Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सकाळी उठताच वापरता स्मार्टफोन? याचा परिणाम इतका वाईट कीं......

सकाळी उठताच वापरता स्मार्टफोन? याचा परिणाम इतका वाईट कीं......


स्मार्टफोनचा वापर किती घातक ठरू शकतो, यासंदर्भात एक धक्कादायक दावा समोर आला आहे. साधारणपणे, तज्ञ स्मार्टफोनच्या अतिवापराचं वर्णन म्हणजे एक व्यसन म्हणून करतात . ज्यामुळे बरंच नुकसान होतं. आता स्मार्टफोनशी संबंधित एक रंजक गोष्ट समोर आली आहे. एक न्यूरोपॅथिक डॉक्टर म्हणतात की, जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन सकाळी उठताच सर्वात आधी वापरलात तर त्यामुळे तुम्हाला दिवसभर त्रास होऊ शकतो.

याचा अर्थ असा की तुम्हाला तुमचा दिवस प्रभावी आणि कार्यक्षमतेने घालवायचा असेल तर तुम्हाला सकाळी डोळे उघडताच फोनसारख्या गोष्टी वापरणं बंद करावं लागेल. मिररच्या वृत्तानुसार, न्यूरोपॅथिक तज्ञ जेनी बोरिंग म्हणतात की, सकाळी उठल्याबरोबर फोनचा वापर केल्याने आपली मज्जासंस्था अधिक सक्रिय होते.

सकाळी उठल्यावर मोबाईल फोन वापरला तर त्याचा शरीरावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे चयापचय क्रिया प्रभावित होऊन डोकेदुखीही सुरू होते. बोरिंगच्या मते, नर्वस सिस्टमला जास्त उत्तेजित करणं एकूण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. सकाळी सर्वात आधी फोन वापरल्याने मेंदूतील डोपामाइनची पातळी वाढते, ज्यामुळे मेंदू आणि मज्जासंस्था अधिक उत्तेजित होते. डॉक्टर म्हणतात की सेल फोनच्या इलेक्ट्रिक आणि चुंबकीय फील्डचा थेट आपल्या मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. ते म्हणतात, की या संपूर्ण गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे शरीराला मॅग्नेशियमची जास्त गरज पडते.

इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमुळे डोकेदुखी होऊ शकते आणि दिवसभर आपली ऊर्जा पातळी आणि मेटाबॉलिज्म प्रभावित होऊ शकतं. सायकोलॉजिस्ट जे राय असंही म्हणतात की, सकाळी उठल्यावर फोन वापरणं टाळावं. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपला मेंदू झोपेच्या वेळी निर्माण होणाऱ्या डेल्टा लहरींची निर्मिती थांबवतो. गाढ झोपेत या लहरी बाहेर पडतात. त्यांच्या जागी, जेव्हा मेंदू जागा होतो, तेव्हा तो थीटा लहरी उत्सर्जित करू लागतो. जे दिवसा झोपेच्या वेळी सोडले जातात आणि नंतर लगेच उठल्यानंतर आणि विश्रांतीच्या अवस्थेत अल्फा लहरी सोडल्या जातात. प्रथम म्हणजे, फोन वापरल्याने आपल्या मेंदूला थीटा आणि अल्फा लहरी निर्माण होण्याची संधी मिळत नाही आणि मेंदू पूर्णपणे जागा होतो. .

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.