Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोणत्या गोष्टी स्वस्त आणि महाग? सर्वसामान्यांना मोठा दिलासा

कोणत्या गोष्टी स्वस्त आणि महाग? सर्वसामान्यांना मोठा दिलासा


मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली आहे. याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही पाहायला मिळणार आहेत.

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  2024 या आर्थिक वर्षासाठी अंतरीम अर्थसंकल्प  सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. या अर्थसंकल्पात काही गोष्टींवरील कर कमी झाल्याने त्यांच्याशी संबंधित उत्पादने स्वस्त होणार आहेत. तर, काही गोष्टी महाग होणार आहेत. अंतरिम अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारने मोठी घोषणा करत जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

अंतरीम अर्थसंकल्पातील घोषणांसह यावेळी, कोणत्या वस्तू महाग होतील, कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील  याचीही लोकांमध्ये उत्सुकता होती. भारत सरकारने मोबाईल फोनच्या  उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क  कमी केले. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील  आयात शुल्क  15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली आहे. याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही पाहायला मिळणार आहेत.

2023 च्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त?

2023 च्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर मोबाईल फोन, टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रिक कारची बॅटरी, हिऱ्याचे दागिने, खेळणी, कॅमेरा लेन्स, कपडे, बायोगॅसशी संबंधित वस्तू, लिथियम सेल्स, सायकल आदी गोष्टी स्वस्त झालेल्या.

2023 च्या अर्थसंकल्पात कोणती गोष्टी महाग झालेल्या?

2023 च्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सिगारेट, एक्स-रे मशीन, विदेशी किचन चिमणी, मद्य, छत्री, सोने,आयात केलेले चांदीचे दागिने, चांदीची भांडी, प्लॅटिनम, हिरा
कम्पाऊंडेड रबर आदी गोष्टी महाग झालेल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.