वेळीच घरच्या घरी वॉटर प्युरिफायर साफ करा; नाहीतर तुमच्याही फिल्टरमध्ये जमा होतील लाल अळ्या
पुण्यातील मागील काही दिवसांपासून भयंकर प्रकार सुरु आहेत. कुठे डासांचा थयथयाट, तर कुठे वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या आढळणे. यामुळे प्रत्येक पुणेकर त्रस्त आहेत. सध्या वॉटर प्युरिफायरमध्ये लाल अळ्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.
पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत हा प्रकार घडला असून, पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळे प्युरीफायरमध्ये लाल अळ्या सापडल्या आहेत. वॉटर प्युरिफायर वेळेवर साफ करणं गरजेचं आहे. बराच काळ प्युरीफायर साफ न केल्यामुळे पाणी योग्यरित्या प्युरीफाय होत नाही . दुषित पाणी प्यायल्यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे वॉटर प्युरिफायर साफ करण्याची योग्य पद्धत कोणती? आणि मुख्य म्हणजे प्युरीफायर कधी साफ करावे? पाहूयात
यापद्धतीने करा वॉटर प्युरिफायर साफ
वॉटर प्युरिफायर स्वच्छ करण्यासाठी, प्रथम त्याचे सगळे स्वीच बंद करा. त्यातील फिल्टर कँडल काढून गरम पाण्यात ठेवून स्वच्छ करा. गरम पाण्याने स्वच्छ केल्याने वॉटर प्युरिफायर कँडलमध्ये अडकलेली सर्व घाण साफ होते. आता एका भांड्यात पाणी घ्या. त्यात एक चमचा डिटर्जंट मिसळा, तयार पाण्याने फिल्टर स्वच्छ करा.
प्युरीफायर साफ करण्याची योग्य पद्धत
फक्त फिल्टर नाही तर, आपण संपूर्ण प्युरीफायर स्वच्छ करू शकता. वॉटर प्युरिफायरवर अनेक डाग लागतात. हे हट्टी डाग लवकर निघत नाही. हे घालवण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा. तयार पेस्ट फिल्टरच्या बाहेरील बाजूस लावा, व सुती कापडाने पुसून काढा. महिन्यातून एकदा आपण फिल्टर अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता. अधिक काळ फिल्टर साफ न केल्यामुळे त्यात घाण साचू लागते. त्यमुळे महिन्यातून एकदा फिल्टर घरच्या घरी स्वच्छ करणे गरजेचं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.