Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई! 'इंटेल'च्या माजी अधिकारी अवतार सैनी यांचा सायकल अपघातात मृत्यू

मुंबई! 'इंटेल'च्या माजी अधिकारी अवतार सैनी यांचा सायकल अपघातात मृत्यू

नवी मुंबई : 'इंटेल' या कंपनीच्या ९०च्या दशकातील 'पेंटियम' या संगणक प्रोसेसरच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी (वय ६८) यांचा बुधवारी सकाळी नवी मुंबईतील पामबिच मार्गावर अपघाती मृत्यू झाला. सायकलस्वारी करत असताना सैनी यांच्या सायकलीला मागून भरधाव वेगाने आलेल्या टॅक्सीने धडक दिली.

अवतार सैनी हे चेंबूर ते खारघर, खोपोली अशी सायकलस्वारी नियमितपणे करत असत. ते आपल्या चमूसह बुधवारी सकाळी जात असताना पामबिच मार्गावर बेलापूरनजीक महापालिका मुख्यालयासमोर त्यांच्या सायकलला अपघात झाला. या दुर्घटनेत सैनी यांचा जागीच मृत्यू झाला. सैनी यांनी मुंबईच्या व्हीजेटीआय संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील एका विद्यापीठातून मायक्रोप्रोसेसर आणि डेव्हलपिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि इंटेल कंपनीत रुजू झाले. १९९३ साली इंटेलने निर्माण केलेल्या पेंटियम प्रोसेसरच्या निर्मितीप्रक्रियेत ते प्रमुख रचनाकार होते. मायक्रोप्रोसेसरच्या रचनेशी संबंधित सात पेटंट सैनी यांच्या नावावर आहेत. २००४मध्ये ते इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालकपदावरून निवृत्त झाले आणि भारतात स्थायिक झाले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.