Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या; पोटच्या मुलानंच घेतला दारू साठी आईचा जीव

प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या; पोटच्या मुलानंच घेतला दारू साठी आईचा जीव


वृद्ध आई वडिलांना आश्रमात पाठवण किंवा त्यांना घरातून बाहेर काढणं, मारहाण करणं असे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. श्रीमंतांपासून गरीबांच्या घरातही असे प्रकार घडतात. कलाकारांना देखील ही परिस्थिती सुटलेली नाही.

प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्रीची हत्या झाली असून तिच्या मुलानं तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. 74वर्षांच्या अभिनेत्री मृत्यूनं एकच खळबळ उडाली आहे. सिनेसृष्टीतील तिला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

2021 साली आलेल्या 'कदैसी विवासयी' या तमिळ सिनेमातील अभिनेत्री कासियाम्मल हिची हत्या झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या मुलानं 4 फेब्रुवारी रोजी रात्री 3 वाजता हत्या केली. अभिनेत्रीनं मुलाला दारू प्यायला पैसे दिले नाही. या रागातून त्यानं जन्मदात्या आईला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोटच्या मुलानं अभिनेत्रीला वाईट पद्धतीनं मारलं आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीनं मुलाला दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे मुलगा चिडला. दोघांमध्ये सुरूवातीला बाचाबाची झाली. हे भांडण इतकं वाढलं की मुलानं अभिनेत्रीला मारायला सुरूवात केली. अभिनेत्रीनं स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला पण मुलाचा राग इतका अनावर झाली की त्यानं एका लाकडाच्या फळीनं आईवर हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्रीचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला ताब्यात घेतलं आहे. तसंच ज्या फळीनं अभिनेत्रीवर हल्ला केला ती फळी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. अभिनेत्रीच्या 51वर्षाच्या मुलावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नम्माकोडी असं अभिनेत्रीच्या मुलाचं नाव आहे. त्याच्यावर IPC कलम 302अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्रीचा मुलगा काही वर्षांपूर्वीच त्याच्या बायकोपासून वेगळा झाला आहे. पैशांसाठी तो अभिनेत्रीवर अवलंबून होता. पोलिसांनी अभिनेत्रीच्या मुलाला ताब्यात घेतलं असून ते त्याची सखोल चौकशी करत आहेत. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तिनं कदैसी विवासयी या सिनेमात अभिनेता नल्लंदी आणि विजय सेतुपतिबरोबर काम केलं होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.