पिकअपचा भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने १४ ठार
मध्य प्रदेशमधील दिंडोरी येथील बडझार घाटात पिकअप वाहनाचा ताबा सुटल्याने पलटी झाले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
दिंडोरी जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी ही माहिती दिली. शाहपुरा पोलिस स्टेशन आणि बिचिया पोलिस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटात हा अपघात झाला. अपघातातील जखमी बेबी शॉवरला उपस्थित राहून माघारी परतत होते. त्यांच्यावर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.