Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरन्यायाधीशांच्या संतापाचा कडेलोट, भाजपला मोठा झटका, सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश

सरन्यायाधीशांच्या संतापाचा कडेलोट, भाजपला मोठा झटका, सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश


चंदीगड महापौर निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड  यांच्या नेतृत्वाखाली 3 न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी केली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी पीठासीन कार्यालयाचा व्हिडीओही  पाहिला आहे. त्यामध्येमध्ये ते मतं रद्द करत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर बोलताना त्यांनी ही लोकशाहीची थट्टा असल्याचा ठपका सरन्यायाधीशांनी ठेवला आहे.

जो प्रकार घडला आहे, ते पाहून आम्ही हादरलो असल्याचेह त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही ही लोकशाहीची अशा प्रकारे हत्या होऊ देऊ शकत नाही, असंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. यावेळी सरन्यायाधीशांनी निवडणुकीचा संपूर्ण व्हिडिओही सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेकॉर्ड देण्याच्या सूचना

चंदीगड महापौर निवडणुकीला आव्हान देणाऱ्या आप आणि काँग्रेसचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे ही सर्व कागदपत्रे आणि सर्व व्हिडिओ पुराव्यांसह संपूर्ण रेकॉर्ड संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’

कामकाज तूर्तास स्थगित

या सगळ्या प्रकारामुळे चंदीगड महापालिकेची 7 फेब्रुवारी रोजी होणारी पहिली सभा अनिश्चित काळासाठी स्थगितही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नव्या महापौरांचे कामकाज तूर्तास तरी स्थगित ठेवण्यात येणार आहे.

रेकॉर्ड सोपवण्याचे आदेश

सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, ‘आम्ही निर्देश देतो की महापौर चंदीगड महानगरपालिका निवडणुकीचे संपूर्ण रेकॉर्ड उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे जप्त करावे आणि मतपत्रिका, व्हिडिओग्राफीदेखील जपून ठेवण्यात यावी. या प्रकारामुळे रिटर्निंग ऑफिसरलाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे जे असेल तर रेकॉर्ड सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चंदीगडच्या महापौर निवडीप्रकरणी आज म्हणजेच सोमवारी सुनावणी सुरू केली आहे. आजच्या सुनावणीनंतर होणारी सुनावणी 12 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

कामकाजामध्ये काय घडले?

या प्रकरणात अधिवक्ता कुलदीप कुमार यांनी महापौर निवडणुकीची नव्याने मागणी करत न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी मुख्य न्यायमूर्तींना पेनड्राईव्ह देऊन निवडणुकीच्या कामकाजात काय घडले तेही पाहण्याची सूचना करण्यात आली आहे. याच पेनड्राईव्हमध्ये पीठासीन कार्यालयाचा एक व्हिडिओही समोर आला होता, त्यामध्ये ते मतपत्रिकेवर पेन वापरत असल्याचे दिसले होते. तसेच भाजपचे उमेदवार मागच्या दाराने कसे येतात आणि महापौरांच्या खुर्चीवर बसतात, असा थेट आरोपही करण्यात आला आहे.

ही लोकशाहीची थट्टा

या प्रकरणावर सरन्यायाधीश यांनी सांगितले की, ‘पीठासीन अधिकाऱ्यांनी मतपत्रिका खराब केल्याचे यामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही झाली पाहिजे.’ पीठासीन अधिकाऱ्याच्या कॅमेऱ्यामध्ये पाहिल्यावर त्यावर त्यांनी सवाल केला आहे की, ते कॅमेऱ्यामध्ये का बघत आहात? यावेळी त्यांनी वकिलांना उद्देशूनही म्हटले आहे की, ‘ही लोकशाहीची थट्टा असून ही लोकशाहीची हत्या असल्याचा गंभीर टीप्पणीही त्यांनी केली आहे.’ तसेच हे रिटर्निंग ऑफिसचे वर्तन आहे का? असा सवाल करून रिटर्निंग ऑफिसरला सांगा की, सरन्यायाधीश हे त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.”

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.