Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, ट्रेनखाली चिरडून १२ जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, ट्रेनखाली चिरडून १२ जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, ट्रेनखाली चिरडून १२ जणांचा मृत्यू झारखंडमधील जमतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंग एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. तेवढ्यात समोरुन आलेल्या झाझा-आसनसोल या ट्रेनने प्रवाशांना धडक दिली. काही प्रवाशांना ट्रेनने धडक दिली. याच घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

तर १२ जण जखमी झाले.

घटनास्थळी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. अंग एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ट्रेनला अचानक थांबवण्यात आलेलं होतं. तेवढ्यात घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. दुर्दैवाने समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल ही गाडी प्रवाशांना चिरडून निघून गेली.

अपघातामध्ये मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु झालं आहे. रात्री ९ वाजेपर्यंत दोन जणांची ओळख पटवण्यात आलेली होती. एकाचं नाव मनिष कुमार असल्याचं सांगितलं जातंय. त्याचं आधार कार्ड रेल्वे ट्रॅकवर सापडलं आहे. दुसरं नाव सिकंदर कुमार असून त्याच्या वडिलांचं नाव आदिकाल यादव असं आहे. तो धपरी झाझा जमुई येथील रहिवाशी आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.