Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सराईताकडून तीन देशी बनावटीची पिस्तूले, १० काडतुसे जप्तदीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सांगली एलसीबीची कारवाई

सराईताकडून तीन देशी बनावटीची पिस्तूले, १० काडतुसे जप्तदीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सांगली एलसीबीची कारवाई

सांगली : अवैधरित्या देशी बनावटीची पिस्तूले बाळगून त्याची विक्री करण्यासाठी घानवड (ता. खानापूर) येथे आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन पिस्तूले, १० काडतुसे असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

अमोल विलास खरात (वय २९, रा. दहिवडी, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विनापरवाना तसेच अवैधरित्या अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. त्यानुसार पथक विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेत होते. 

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खरात हा देशी बनावटीची पिस्तूले विक्री करण्यासाठी घानवड (ता. खानापूर) येथे येणार असल्याची माहिती पथकातील बिरोबा नरळे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने घानवड येथे सापळा रचला होता. विटा-मायणी रस्त्यावरील घानवड येथील भाग्यनगर फाटा येथे अमोल सॅक घेऊन उभे असल्याचे पथकाच्या निदशर्नास आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये तीन देशी बनावटीची पिस्तूले तसेच दहा काडतुसे सापडली. पिस्तूलांचा परवानाही त्याच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला अटक करून त्याच्याकडील पिस्तूले, काडतुसे जप्त करण्यात आली. त्याला विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, विक्रम खोत, उदयसिंह माळी, संदीप नलवडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.