Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कारला लावली काळी काच, ती पडली साडेसात लाखांस

कारला लावली काळी काच, ती पडली साडेसात लाखांस

सांगली : मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार मोटारीच्या वाहनांना काळ्या रंगाचे फिल्मिंग करता येत नाही. वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेकडून कारवाईवेळी जागेवरच फिल्मिंग काढले जाते. तसेच दंड केला जातो. गतवर्षात ११४५ वाहनांवर कारवाई करून ७ लाख ५४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

काळ्या काचामुळे मोटार कोण चालवते दिसत नाही. अशा गाडीचा अपघात झाल्यास कोण चालक समजून येत नाही. तसेच देशात यापूर्वी काही अतिरेकी कारवायांमध्ये काळ्या रंगाच्या काचा लावलेल्या मोटारीतून अतिरेकी आल्याचे स्पष्ट झाले होते. काही राजकीय व्यक्तीही किंवा बड्या असामी काळ्या रंगाची काच वापरतात. मोटार वाहन कायद्यातील कलम १०० (२) १७७ नुसार मोटारीच्या काचांना काळ्या रंगाचे फिल्मिंग करता येत नाही.


अशा वाहन चालकास ५०० रुपये दंडाची तरतूद केली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने गतवर्षात ११४५ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ७ लाख ५४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच त्यांच्या गाड्यांचे फिल्मिंगही जागेवरच कटरच्या साहाय्याने काढण्यात आले आहे. मोटारीचे उत्पादन होताना नियमानुसार काचेचा रंग असतो. नंतर बरेचजण रेडियम आर्टिस्टकडून फिल्मिंग करून घेतात. आरटीओकडून सतत फरन्सी नंबरप्लेट, कर्णककर्कश हा'र्न तसेच प्रदूषणाबाबत कारवाई करण्यात येते. आता फिल्मिंगची भर पडली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.