शरीरात पाणी साचल्याने झाला 'दंगल फेम बबीता' चा मृत्यू, जाणून घ्या या आजाराची कारणे
शरीरात पाणी साचल्याने झाला 'दंगल फेम बबीता' चा मृत्यू, जाणून घ्या या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपाय दंगल चित्रपटात आमिर खानची मुलगी आणि लहान बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा खूप आवडली होती. तिने या चित्रपटात बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारली होती. आता तिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या मृत्यूचे कारण काही औषधांचे दुष्परिणाम असल्याचे सांगितले जाते, ज्यामुळे तिला गंभीर स्थितीला सामोरे जावे लागले आणि तिचा मृत्यू झाला. तिच्यावर बरेच दिवस उपचार सुरू होते आणि उपचार म्हणून ती काही औषधे घेत होती. पण औषधे घेतल्याने काही दुष्परिणाम झाले त्यामुळे त्यांच्या शरीरात पाणी साचू लागले आणि तेच तिच्या मृत्यूचे कारण बनले. शरिरात पाणी कसे साठवले जाते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आज आपण या आजाराबाबात महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
वॉटर रिटेन्शन म्हणजे काय?
मानवी शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे हे तुम्हा सर्वांना माहित असेलच. पाणी आपल्याला अन्नातून मिळणारे पोषण विरघळण्यास आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. पण कधी कधी घाम, लघवी किंवा अश्रूंच्या रूपात पाणी शरीरातून बाहेर पडू शकत नाही आणि शरीरात साचते, तेव्हा त्याला वॉटर रिटेन्शन म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला एडेमा असेही म्हणतात. जर हा आजार काही काळ टिकून राहिला तर तो सामान्य मानला जातो आणि सहज बरा होऊ शकतो. पण जर ही स्थिती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
हार्मोनल बदल आणि जास्त प्रमाणात मिठाचे सेवन तुमच्या शरीरात पाणी साठवून ठेवू शकते. खरे तर आपले शरीर प्रामुख्याने पाण्यापासून तयार झाले आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी संतुलित नसते, तेव्हा तुमच्या शरीरात ही समस्या उद्भवू लागते. यामुळे तुमच्या शरीराचे वजन अचानक वाढणे, तुमच्या अंगावर सूज येणे असे लक्षणं दिसून येते. शरीरात पाणी साचणे ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. आहार, मासिक पाळी, अनुवांशिक घटक अशा अनेक कारणांमुळे होऊ शकते. पण तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
शरीरात पाणी साचण्याची लक्षणे कोणती?
जेव्हा तुम्ही डाएटिंग करूनही वजन कमी करू शकत नाही.तुमच्या घोट्यात सूज दिसते.कोणत्याही कारणाशिवाय कमी कालावधीत जास्त वजन वाढणे.तुमचे पोट फुगणेत्वचा दाबल्यावर पाणी बाहेर येणेशरीरात पाणी साचले हे कसे ओळखावे?यासाठी, तुमचा पाय आणि घोटा (सुजलेला भाग) दाबा आणि काही सेकंद वाट बघा. जर तुमच्या सूजलेल्या भागात गड्ढा तयार होत असेल तर शरीरात पाणी साचल्याचे हे पहिले लक्षण असू शकते. आपल्या अंगठ्याने हळू हळू दाब द्या यामुळे सुजलेल्या भागातून पाणी बाहेर येऊ शकते.
पाणी साचण्याची कारणे
तुमच्या शरीरात प्रथिनांची कमतरता असली तर शरीरात पाणी साचण्याची समस्या असू शकते.
काही लोकांचे शरीर अनेक प्रकारचे अन्न पचवू शकत नाही, त्यामुळे पाणी टिकून राहते.
अशक्तपणा देखील कधीकधी पाणी टिकवून ठेवण्याचे कारण आहे. उच्च रक्तदाब आणि स्टिरॉइड्समध्ये मोठ्या प्रमाणाच औषधे सेवन केल्याने देखील पाणी टिकून राहते. यावप उपचार कसे करावे
पोटॅशियमचे सेवन वाढवा
जर तुम्हाला ही समस्या कमी करायची असेल तर तुम्ही पोटॅशियमचे सेवन वाढवावे. पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेल्या फळे आणि भाज्यांचे सेवन तुम्ही करू शकता. पूरक आहारापेक्षा अन्नपदार्थांचे सेवन अधिक प्रभावी होईल.
व्हिटॅमिन बी 6 चे सेवन वाढवा
पोटॅशियमचे सेवन वाढवण्याबरोबरच, तुम्ही व्हिटॅमिन बी 6 असलेल्या पदार्थांचे सेवन देखील वाढवावे . जेणेकरून पाण्याची साठवणूक कमी करता येईल.
जंक फूड कमी करा
जंक फूडमध्ये मीठ जास्त असते आणि जास्त प्रमाणात सोडियम घेतल्याने शरिरात पाणी साचू शकते. म्हणून, आपण जंक फूडचे सेवन पूर्णपणे बंद केले पाहिजे आणि त्याऐवजी आपल्या आहारात पोषक तत्वांनी समृद्ध ठेवा. जंक फूड व्यतिरिक्त, जर तुम्ही जास्त खारट पदार्थ खात असाल तर तुमच्या जेवणात मिठाचा वापर कमी करावा.शरीरात पाणी साचणे हे एडेमासारख्या वैद्यकीय स्थितीमुळे होऊ शकते. ही एक गंभीर स्थिती आहे, जी संपूर्ण आरोग्यावर गंभीरपणे परिणाम करू शकते. या स्थितीत शरीराच्या ऊतींमध्ये जास्त पाणी जमा होऊ लागते. यामुळे अनेक समस्या दिसू शकतात जसे की, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, नसा नीट काम न करणे इ. जेव्हा शरीरात पाणी साचू लागतो, तेव्हा त्वचेच्या खाली, पाय किंवा हातांमध्ये ऊतींना सूज येते. अशी समस्या एखाद्या व्यक्तीच्या लक्षात आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
टिप- या लेखात दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ही स्वीकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.