खासदार संजय काका पाटील यांची प्रभाग निहाय आढावा बैठकीस आजपासून सुरुवात
खासदार संजय काका पाटील यांची प्रभाग निहाय आढावा बैठकीस आजपासून सुरुवात झाली. महापालिका क्षेत्रात पुढील 10 दिवस खासदार संजयकाका पाटील आढावा बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सांगलीतील प्रभाग 14 मधून करण्यात आली. या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त सुनील पवार , उपायुक्त राहुल रोकडे, पोलीस निरीक्षक संजय मोरे, माजी नगरसेवक युवराज बावडेकर , भारती दिगडे, सुबराव मद्रासी, उर्मिला बेलवलकर , वीज मंडळाचे खांडेकर साहेब, अरविंदभाऊ तांबेकर , सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळ ,महसूल विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. या आढावा बैठकीत प्रामुख्याने रस्ते, लाईट, गटारी , स्वच्छता, अतिक्रमण तसेच महिला शौचालय यासह पाणी समस्या , वाहतूक समस्या, रेशन कार्ड बाबतच्या अडचणी नागरिकांनी उपस्थित केल्या.
यावेळी माधुरी वसगडेकर, हनमंतराव पवार, उदय मुळे, स्मिता पवार, स्नेहजा जगताप स्मिता भाटकर , चंद्रकांत पाटील , श्री डोडिया संदीप कुकडे, रसिका भुतडा , भाग्यश्री जोशी सोनाली अवसारे , स्वाती सुतार , संगीता कालेकर, सौ राजमाने, गीता जाधव, सुनीता पाटणकर आदीं नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
*उध्या दि २१/२/२०२४ रोजी साय ४-०० वाजता* मिरज येथील प्रभाग समिती ४ ज्योतिर्लिंग मंदिर मिरज येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आले आह
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.