मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या फेक्सवर बारामतीत शाईफेक
बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर शाई फेकण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे असलेल्या एका फेक्सवर शाईफेक करण्यात आली आहे. प्रकार लक्षात येताच बॅनर काढण्यात आलं आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं एक फेक्स लावण्यात आलं होतं. या फेक्सवर अज्ञाताकडून शाईफेक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून हे फेक्स हटवण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काऱ्हाटी येथे हे जे फेक्स लावण्यात आले होते. त्या फेक्सवर सुनेत्रा पवार यांच्या फोटोसोबतच अजित पवार आणि राष्ट्रवादीचं चिन्ह असलेल्या घड्याळाचा फोटो होतो. मात्र या फेक्सवर अज्ञाताकडून शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेनंतर हे फेक्स हटवण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.