मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय!', नारायण राणेंची जीभ घसरली
गेले काही दिवस मराठा आरक्षण हा मुद्दा खूप चर्चेत आहे. गेले पाच दिवस मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज (दि.१४) खालावली. त्यांच्या नाकातून रक्क येत आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. नारायण राणे यांनी X वर पोस्ट करत जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की 'आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत.'
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या 'X' वर पोस्ट करत मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत ! '
जरांगे-पाटील यांची तब्येत खालावली…
मनोज जरांगे यांची प्रकृती उपोषणाच्या पाचव्या दिवशी आणखी खालावली आहे. यामुळे अंतरवाली सराटीत आंदोलक कार्यकर्ते येण्यास प्रारंभ झाला आहे. उपोषणस्थळाचे वातावरण भावूक बनले आहे. जरांगे यांची ढासळत चाललेली प्रकृती पाहून अनेक महिला व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असून, जरांगे यांनी किमान पाणी तरी घ्यावे असा आग्रह समाजबांधव करीत आहेत. जरांगे-पाटील १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सातत्याने असणारे त्यांचे खासगी डॉ. रमेश तारख हे भेटण्यासाठी आले असता त्यांना आरोग्य तपासणीसाठी जरांगे पाटील यांनी नकार दिला. दरम्यान, जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात आज (बुधवार) अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.
…तर पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाही
मंगळवारी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले होते की, महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही" पुढे बोलत असताना ते म्हणाले की "नुसतं नाटकं सुरु आहेत. तुम्हाला मराठे सोपे वाटतात का?" तर काय नुसतं चाललं आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.