Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली बाजारात हळदीला ३१ हजाराचा उच्चांकी दर

सांगली बाजारात हळदीला ३१ हजाराचा उच्चांकी दर


सांगली: यंदाच्या हंगामातील नवीन हळदीला मुहुर्ताच्या सौद्यामध्ये सांगली बाजारात क्विंंटलला 31 हजाराचा उच्चाकी दर मिळाला.नवीन हंगामातील हळदीचे सौदे शुक्रवारी शुभारंभाने जिल्हा बँंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते व सभापती सुजयनाना शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.

गणपती जिल्हा सेवा सोसायटीमधून हळद सौदे सुरू करण्यात आले. जय श्रीराम ट्रेडिंग कंपनीच्या अडत दुकानात राजेंद्र आनंदराव पाटील या शेतकर्‍याच्या राजापुरी हळदीला क्विंटलला ३१ हजाराचा दर मिळाला. दिलीप ट्रेडर्स या खरेदीदारांने ही हळद उङ्खांकी बोलीने खरेदी केली. आजच्या सौद्यासाठी बाजारात एक हजार २३ पोती आली होती. सौद्यामध्ये किमान दर १० हजार ५०० तर कमाल ३१ हजार असा होता. सरासरी दर १५ हजार रूपये प्रतिक्विंटल होता. 

सांगली बाजार समिती ही हळदीच्या खरेदी- विक्रीसाठी देशात प्रसिद्ध असून शेतकर्‍यांनी त्यांचा शेतीमाल खुल्या सौद्यामध्ये विक्रीसाठी वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे जास्तीत जास्त आणावा. असे आवाहन बाजार समिती सभापती शिंदे यांनी केले. याप्रसंगी उपसभापती रावसाहेब पाटील संचालक संग्राम पाटील, बापूसो बुरसे. स्वप्निल शिंदे, काडाप्पा वारद. बिराप्पा शिंदे. शकुंतला बिराजदार. प्रशांत पाटील मजलेकर, मारुती बंडगर, बाजार समिती सचिव महेश चव्हाण, उप सचिव नितीन कोळसे, चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष अमरसिंह देसाई . हळद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा, व्यापारी दिलीप आरवाडे, मनोहर भाई सारडा. विवेक ट्रेडिंग कंपनी. यु के ट्रेडर्स, सुरज कार्पोरेशन .श्रीराम दयाळ मालू .आर. व्ही. व्यंकटेश ट्रेडर्स.आदी खरेदीदार व्यापारी शेतकरी हमाल उपस्थित होते. सौद्याचे नियोजन बाजार समितीचे पर्यवेक्षक श्री बरुर, श्री तुपारे. प्रथमेश काटे .सुरज मदने यांनी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.