गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी
उल्हासनगर : गणपत गायकवाड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे . भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. गायकवाड यांच्यासह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गणपत गायकवाड आज त्यांना उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व आणखी एका सहकाऱ्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता.
गोळीबारानंतर गणपत गायकवाड व इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. ते 14 फेब्रुवारी, म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडीत होते. आज सकाळी त्यांना उल्हासनगर येथील न्यायलयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायलयाने गायकवाड व इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी असा युक्तिवाद केला की 11 दिवसांची कोठडी मिळाली, आणखी 2 दिवसांची कोठडी मिळवण्यासाठी पोलिसांनी युक्तिवाद केला. त्यानतर आरोपींच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी गायकवाड व इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हा अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
सामान्यत: कोर्टाचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होते. मात्र गायकवाड यांच्या या सुनावणीसाठी आज सकाळी 9 वाजता कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात आले. सुरक्षेच्या हेतूने गायकवाड यांना आज पहाटेच त्यांना न्यायलयात आणण्यात आले.
या सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाच्या परिसरातील वाहतुकीत बदल करत 200 मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. तर दोनशे मीटरच्या बाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ता बंद करत पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला. माध्यम प्रतिनिधींना देखील न्यायालयात व न्यायालयाच्या परिसरात 200 मीटर आज येण्यास बंदी घालण्यात आली.
या गोळीबारानंतर गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मी गोळीबार केला असून, मला कोणताही पश्चाताप नसल्याचे विधान करीत मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते. तसा प्रकार घडू नये, गायकवाड यांनी माध्यमांशी बोलू नये, पोलिस व्हॅनच्या बाहेर डोके काढत प्रसार माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करू नये या साठी पोलीस हे माध्यम प्रतिनिधींना लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.