खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे बापानेच मुलाला संपवले
अकोला जिल्ह्यातील टिटवा गावात प्रेमप्रकरणातून बापानेच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या मुलाने खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे आरोपी वडिलांनीच मुलाच्या हत्येचा सर्व डाव रचला होता. शेवटी संबंधित मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यामध्ये खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यात राहत असलेला मुलगा संदीप गावंडे एका खालच्या जातीतील मुलीवर प्रेम करत होता. या दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता. परंतु त्यांचे हे प्रेम प्रकरण वडील नागोराव गावंडे यांना मान्य नव्हते. तसेच यामुळे घरात देखील अनेकदा वाद झाले होते. शेवटी संदीप आणि संबंधित मुलीने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. हीच गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली. मुलाने खालच्या जातीतील मुलीशी लग्न केल्यामुळे गावात इज्जत जाईल, या भीतीपोटी वडिलांनी संदीपला मारून टाकण्यासाठी पाऊल उचलले.
संदीपच्या वडिलांनी आणि त्याच्याच भावाने घरात कोणी नसताना संदीप गळा आवळून जीव घेतला. हे सर्व प्रकरण घडत्यावेळी घरातील लोक बाहेरगावी गेले होते. त्यामुळे कोणालाच याची खबर लागली नाही. कुटुंबातील सर्व व्यक्ती घरी आल्यानंतर त्यांना संदीप मृत अवस्थेत सापडला. तेव्हा वडिलांनी आणि भावाने संदीपची कोणीतरी हत्या केली आहे असे भासवून दिले. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये रचलेला सर्व डाव उघडकीस आला. सध्या पोलिसांनी संदीपच्या वडिलांना आणि त्याच्या भावाला अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.