Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बनावट दारू विक्री प्रकरणी चौघांवर गुन्हा

बनावट दारू विक्री प्रकरणी चौघांवर गुन्हा

बनावट दारू विक्री प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मामुर्डी येथे उघडकीस आली. कैलास सिताराम लहारे (वय 44, रा. अहमदनगर) यांनी गुरुवारी (दि. १) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुल्फिकार ताज अली चौधरी (वय 64, रा. उत्तर प्रदेश), अमित ठाकूर आहेर (वय 30, रा. तलासरी, जि. पालघर), असलम दौलत खान आणि संजय भगवती पांडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.


ही घटना 23 जानेवारी रोजी जुना पुणे मुंबई महामार्ग, मामुर्डी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करीत असलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची अधिकृत रजिस्टर असलेल्या दारूचे बनावट लेबल तयार केले. ते लेबल दारूच्या बाटलीवर चिटकवले. तसेच त्या दारूची विक्री करताना मिळून आले. आरोपींनी आपसांत संगनमत करून साखर कारखान्यातील प्रवरा बिसलरी विभागाची फसवणूक केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.