Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरात तलवार बाळगणाऱ्या तिघांना अटक


कोल्हापुरात तलवार बाळगणाऱ्या तिघांना अटक

कोल्हापूर :  कोल्हापूर शहरात शुक्रवारी रात्री कोम्बिंग आपरेशन करण्यात आले. यावेळी राजारामपुरी, सम्राटनगर परिसरात तलवार बाळगणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

गौरव अशोक भालकर (वय ३२), राजू भिमा पंतोजी (वय २३, दोघेही रा. सम्राटनगर, कोल्हापूर), संतोष रामसिंग गौतम (वय २७, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री कोल्हापूर पोलिसांतर्फे शहरात कोम्बिंग आपरेशन राबवण्यात आले. त्यावेळी राजारामपुरी परिसरातील गुन्हेगारांचे अड्डे, निवासस्थाने यांच्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी या तिघांकडे तलवारी आढळल्या. त्या जप्त करून तिघांनाही अटक करण्यात आली. 

कोल्हापूरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास आडसूळ, श्री. चव्हाण, श्री. खराडे, श्री. शिरगावकर, श्री. पाटील, श्री. पावरे, श्री. कुंभार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.