कर्मवीर पतसंस्थेची अल्पावधीत नेत्रदिपक प्रगती : आमदार प्रकाश आवाडे कबनूर येथील ६१ व्या शाखेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन
सांगली :- कर्मवीर पतसंस्थेने अल्पावधीत केलेली नेत्रदिपक प्रगती ही आर्थिक क्षेत्रात इतरांनी आदर्श घ्यावी अशीच आहे. सभासदांच्या सर्वांगीन उन्नतीचे स्वप्न घेऊन संस्थेचे संचालक मंडळ कार्यरत असल्यामुळे सभासदांनी संस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. संस्थेने सभासद ठेवीदार, कर्जदार, सेवक या सर्वांची काळजी संचालक मंडळ घेत आहे हे संस्थेच्या प्रगतीवरुन दिसून येते. सभासदांना सातत्याने उच्चांकी लाभांप देणारी कर्मवीर पतसंस्था एकमेव असून शैक्षणिक कार्यास देखील संस्थेने हातभार लावावा असे प्रतिपादन माजी मंत्री आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
कर्मवीर पतसंस्थेच्या कबनूर ता. हातकणंगले येथील ६१ व्या शाखेचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले त्यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा.पी.एम. पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करीत असताना संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्था सभासदांना देत असलेल्या आर्थिक सेवांचा आढावा घेतला, संस्था अतिशय विचारपूर्वक आणि चोखंडळपणे कारभार करीत असून कर्मवीर आण्णांच्या आचार आणि विचाराचा वारसा आमच्या समोर असल्यामुळे ठेवीदारांची रक्कम ही आमच्याकडे असलेला ठेवा असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असल्याची ग्वाही त्यांनी दिली. संस्थेच्या ठेवी रु.१०५८ कोटी असून संस्थेने रु. ७९० कोटीचे कर्ज वितरण केले आहे. संस्था सभासदांना सर्व ऑनलाईन सेवा देत आहे. संस्थेचा स्वनिधी रु.९३ कोटीचा असून गुंतवणुक रु.३३८ कोटी आहे. संस्थेचा मिश्र व्यवसाय रु. २००० कोटीकडे वाटचाल करीत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना पी.एम. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करुन आपल्या भागातील संस्था एवढी मोठी झाल्याचा खुप आनंद असल्याचे सांगितले. संस्थेचे कार्य पाहुन त्यांनी स्वतःची रु.५. लाखाची ठेव संस्थेत ठेवली आणि इतरांनी देखील ठेवी ठेवाव्यात असे आवाहन केले. ही शाखा संस्थेची अग्रगण्य शाखा होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास नवमहाराष्ट्र सुतगिरणीचे माजी चेअरमन श्री. सुधाकर मणेरे, कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. जयकुमार कोले, कबनूरच्या सरपंच सौ. शोभा पोवार, रुईच्या सरपंच सौ. शकिला कोन्नुरे, चंदूर च्या सरपंच सौ. स्नेहल कांबळे, माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे, नगरसेविका सौ. सुजाता कोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शाखेचे नुतन सल्लागार श्री. रविंद्र बाळासाहेब केटकाळे, पारिसा तातोबा भरमगोंडा, दिपक बाळासो केटकाळे, कुमार देऊ मगदुम शशांक शिरीष केटकाळे, जयकुमार बाबुराव काडाप्पा यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम, विभागीय अधिकारी श्री. अभिजीत जिनगोंडा खोत शाखाधिकारी शुभम अशोक मगदुम यांचा आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. बबन केटकाळे, दिगंबर जैन बोडींग इचलकरंजी चे अध्यक्ष श्री. रविंद्र पाटील, आदिनाथ बँकेचे चेअरमन श्री. सुभाष काडाप्पा, जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. बाबासो चौगुले हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार करणेत आला.
या वेळी संस्थेचे संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ.के. चौगुले (नाना), डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्री. 'भारती आप्पासाहेब चोपडे सौ. चंदन नरेंद्र केटकाळे. तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासो भाऊसो थोटे, श्री. बजरंग माळी यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले सुत्र संचालन संजय सासणे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.