Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप आमदाराची कोठडीत अशी गेली रात्र: फरशीवर झोपले

भाजप आमदाराची कोठडीत अशी गेली रात्र: फरशीवर झोपले 


रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड हे पोलीस कोठडीत असून, त्यांना घरचं जेवण नाकारण्यात आलं असून, फरशीवरच झोपावं लागलं. कोठडीत ठेवल्यानंतर कोणती खबरदारी घेतली जात आहे, हेच जाणून घ्या…

गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातील सुप्त संघर्षाला हिंसक वळण मिळालं. आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. या प्रकरणात पोलिसांनी आमदार गायकवाड यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गणपत गायकवाड यांना कुठे ठेवण्यात आले आहे?

गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले आहे. पण, त्यांना शनिवारची (3 फेब्रुवारी) रात्र फरशीवरच झोपून काढावी लागली. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पोलिस काळजी घेताहेत. कळवा पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करत आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांनाही नाव, पत्ते आणि फोन नंबर आदी माहिती घेऊन आता सोडलं जातं आहे.

न्यायालयाच्या परवानगीनंतरच घरचं जेवण

गणपत गायकवाड यांना घरचं जेवण देण्याची परवानगी त्यांच्या कुटुंबीयांनी मागितली होती. पण, पोलिसांनी परवानगी नाकारली. न्यायालयाचे आदेश आल्यानंतरच घरचं जेवण दिलं जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तसेच रक्तदाबाचं औषधही डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात आलं. गायकवाड यांच्यासह या प्रकरणातील तिन्ही आरोपींना एकाच कोठडीत ठेवण्यात आलंय. तिथं फॅनचीही सुविधा नसल्यानं डासांमध्ये गणपत गायकवाडांना रात्र काढावी लागली 

आरोपींना देण्यात येणारं भाजी, पोळी, भात असा जेवणाचा भत्ताही गायकवाड यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या सगळ्या हालचालींवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे या घटनेमुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात तणाणपूर्ण शांतता आहे. राजकारणही तापलं असून, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने येतानाद दिसत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.