Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

मागील काही दिवसांपासून अपघातांच्या मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला असून, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर एक कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. दरम्यान, शिर्डीकडे भरधाव जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचालकाला धडकल्यानंतर कंटेनरवर दूर जाऊन आदळली. ज्यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे मृत व्यक्तींचे नावं आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रात्री 11 च्या सुमारास कारचा अपघात झाल्याची घटना घडलीय. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी पोहचत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातात MH 21 BF 9248 या क्रमांकाच्या कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असून, ते शिर्डीकडे निघाले होते. अपघातात फलके व वाघ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.


तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले

धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. जालन्याहन शिर्डीकडे भरधाव जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचालकाला धडकल्यानंतर कंटेनरवर जाऊन आदळली. ज्य्ता तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहेत. तर, तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नादुरुस्त कंटेनरमुळे गेला तिघांचा जीव...

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघाताला समृद्धी महामार्गावर उभा असलेला एक नादुरुस्त कंटेनर कारणीभूत ठरला आहे. नादुरुस्त कंटेनर महामार्गावर उभा होता. मात्र, जालन्याकडून येणाऱ्या कारचालकाला तो कंटेनर उभा असल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वेगात असलेली कार थेट कंटेनरला जाऊन धडकली. ज्यात तिघांचा जीव गेला. त्यामुळे समृद्धी महामार्गावर बंद पडलेलं कंटेनर बाजूला का करण्यात आले नाही, महामार्गावर पोलिसांची पेट्रोलिंग सुरु नव्हती का? जर पोलिसांनी बंद पडलेला कंटेनर पाहिला होता तर बाजूला का करण्यात आला नाही? असे अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.