Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉलेज ड्रॉपआऊट, भावासोबत उभी केली ८१,००० कोटींची कंपनी

कॉलेज ड्रॉपआऊट, भावासोबत उभी केली ८१,००० कोटींची कंपनी

राजीव जुनेजा हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. भारतीय फार्मा बिझनेसमध्ये त्यांचं मोठं नावही आहे. त्यांनी त्यांचा मोठा भाऊ रमेश जुनेजा यांच्यासमवेत त्यांनी मॅनकाइंड फार्माची पायाभरणी केली. औषधं आणि हेल्थकेअर प्रोडक्ट बनवणारी ही एक आघाडीची भारतीय कंपनी आहे. राजीव हे कंपनीचे उपाध्यक्ष आणि एमडी आहेत. ही कंपनी १९९५ मध्ये सुरू झाली. राजीव जुनेजा कंपनीचा भारतीय व्यवसाय पाहतात. जुनेजा बंधूंनी एकट्यानं कंपनीची उभारणी आणि विस्तार केला. मॅनकाइंड फार्माचे अध्यक्ष रमेश सी जुनेजा १९७४ मध्ये Kee फार्मा नावाच्या कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी आठ वर्षे ल्युपिनसोबत काम केलं.

१९९४ मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली. त्यानंतरच १९९५ मध्ये राजीव त्यांनी मॅनकाइंड सुरू केली. ही कंपनी ५० लाख रुपयांच्या भांडवलानं सुरू करण्यात आली होती. २५ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यासह त्यांनी ही फर्म सुरू केली. राजीव हे कॉलेज ड्रॉपआऊट आहेत. तर रमेश जुनेजा हे सायन्स ग्रॅज्युएट आहेत.


फोर्ब्सनुसार, गेल्या वर्षी १२ ऑगस्टपर्यंत राजीव जुनेजा यांची एकूण संपत्ती सुमारे २.५ अब्ज डॉलर्स होती. हे सुमारे २०,७४९ कोटी रुपये आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. मेरठहून आलेल्या जुनेजा बंधूंनी २२ वर्षांत लहान शहरं आणि ग्रामीण भागात इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्तात औषधं विकून फार्मा क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली.

निरनिराळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मॅनकाइंड फार्माचे बाजार भांडवल सुमारे ८१,५२९.७६ कोटी रुपये होते. कंपनीच्या लोकप्रिय ब्रँड्समध्ये मॅनकाइंड कंडोम आणि प्रेगनन्सी टेस्ट किट प्रेगा न्यूज यांचा समावेश आहे. देशांतर्गत विक्रीच्या बाबतीत ही कंपनी भारतातील चौथी मोठी कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादनांची १०० पेक्षा जास्त देशांमध्ये विक्री केली जाते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.