Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावळजमध्ये तरूणाचा निर्घ्रुण खून

सावळजमध्ये तरूणाचा निर्घ्रुण खून


सांगली :  तासगाव तालुक्यातील सावळज येथे एका तरूणाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घ्रुण खून करण्यात आला. बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तरूणाच्या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. 

भारत उर्फ संतोष संजय पाटील (वय २९, रा. सावळज) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भारतची आई वैशाली संजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे. भारत बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो परत न आल्याने त्याचा शोध घेतल्यानंतर सावळज येथील संजय पवार यांच्या शेततळ्याजवळील कच्च्या रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत तो आढळून आला. त्याला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.  मृत भारतच्या नातेवाईकांनी काहींवर संशय व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत असून याप्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत खुनाचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.