Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावर संतोष कदम याचा निर्घृण खून

कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावर संतोष कदम याचा निर्घृण खून


कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्यावर गट क्रमांक १०१२/१ यांच्या शैतालगत एकाचा अमानुष खून करण्यात आला आहे. कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला असणान्या सीटवर अंदाजे ४० वर्षीय इसमाचा खून करून मारेकरी पलायन झाले आहेत. नांदणी रस्ता हा रहदारीचा असल्याने पेट्रोल संपले म्हणून कुणीतरी गाडी लाजून गेला असावा, असे समजून कोणीही लक्ष दिले नाही. पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती.

सहा वाजण्याच्या सुमारास शेतक-यांनी डोकावून पाहिले असता रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आल्याने कुरुंदवाड पोलिसांना माहिती दिली. सपोनि रविराज फडणीस आपल्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपाधीक्षक समीर साळवे यांना माहिती दिली आहे. पुढील तपासाची चक्री गनिमान हाली आहेत. येथे कान पथक, उसे तज्ज्ञ आणि तपासाची अन्य पथके पाचारण करण्यात आली आहेत.

दरम्यान, सांगली पेथील प्रफुल्ल कदम याचा भाऊ संतोष कदम हा काल रात्रीपासून बेपत्ता आहे. प्रफुल्ले कदम हा त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून कारजवळ आला. दरम्यान, अद्यापही कारगधून मृतदेह बाहेर न काढल्याने ओळख पटू शकलेली नाही, मात्र निळ्या रंगाची स्विफ्ट MH 09 BB 805 माझ्या भावाचीच गाडी असल्याचे प्रफुल्ल कदंग यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या खुनाचे सांगली कनेशन असल्याचे समजते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.