Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साऊथच्या 'थलापती विजय'कडून राजकीय पक्षाची घोषणा!

साऊथच्या 'थलापती विजय'कडून राजकीय पक्षाची घोषणा!

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय हा सध्या त्याच्या राजकीय पक्ष आणि राजकीय प्रवेश याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयच्या राजकीय पक्षाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अखेर विजयनं त्याच्या राजकीय पक्षाचे नाव जाहीर करुन मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्यांचे राजकारणात येणं आणि भूमिका मांडणे हे काही नवीन नाही. यापूर्वी कित्येक बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी राजकीय पक्षातून आपली भूमिका मांडली आहे. याला साऊथचे कलाकारही अपवाद नाहीत. त्यांच्याकडे तर कलाकारांची राजकीय कारकीर्द भली मोठी असल्याचे दिसून आले आहे. अशात आणखी एका प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्यानं त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा करुन चाहत्यांना धक्का दिला आहे.


एएनआयनं एक्स वर पोस्ट करुन थलापती विजयच्या राजकीय पक्षाविषयी माहिती दिली आहे. त्या पोस्टनुसार विजयच्या राजकीय पक्षाचे नाव तमिळगा वेत्री काझीम असे असणार आहे. या पक्षाच्या माध्यमातून विजय राजकारणातून सर्वसामान्य लोकांची भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या राजकीय प्रवेश आणि पक्ष याबाबत चर्चा सुरु होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.