Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जाडरबोबलाद येथे गांजा विक्री करणाऱ्यास अटकदोन किलो गांजा जप्त, उमदी पोलिसांची कारवाई

जाडरबोबलाद येथे गांजा विक्री करणाऱ्यास अटकदोन किलो गांजा जप्त, उमदी पोलिसांची कारवाई

सांगली :  जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथे तयार गांजा विक्री करणाऱ्या तरूणाला अटक करून त्याच्याकडून दोन किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली. 

सुनील राजू वडार (वय ३०, रा. जाडरबोबलाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नशीले, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नूतन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे आढावा बैठकीत दिले आहेत. त्यानुसार सहायक निरीक्षक श्री. शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला असे पदार्थ निर्मिति, विक्री करणाऱ्यांना शोधून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

जाडरबोबलाद येथे एक तरूण एका हॉटेलजवळ थांबून गांजा विक्री करत असल्याची माहिती सहायक निरीक्षक शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकासह तेथे छापा टाकला. त्यावेळी सुनील वडार तेथे संशयास्पदरित्या थांबल्याचे आढळले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन किलो तयार गांजा सापडला. त्यानंतर गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली. 

उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, आप्पासाहेब हाके, प्रशांत कोळी, वहिदा मुजावर, राम बन्नेनवार, मनिष कुमरे, नितीन खोंडे, सुदर्शन खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.