Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

90 कोटीचा दंड प्रदूषण मंडळाकडून वसूल करा: लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

90 कोटीचा दंड प्रदूषण मंडळाकडून वसूल करा: लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

सांगली: कृष्ण नदी प्रदूषणास महापालिका नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही कारणीभूत आहे. मंडळातील अधिकाऱ्यांच्या उंटावरून शेळ्या राखण्याच्या कारभारामुळे कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. केवळ कागदी घोडे नाचविण्याचा एककलमी कार्यक्रम मंडळाकडून सुरू आहे. महापालिका क्षेत्रात तीन औद्यगिक वसाहती आहेत. साखर कारखाने आहेत.  त्यांचे रासायनिक विषारी पाणी थेट महापालिकेच्या नाल्यामध्ये सोडले जाते. 
  
एकाही कारखान्याकडे स्वतःचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही. अशा कारखानदारांना प्रदूषण नियंत्रण सोयीस्कररित्या पाठीशी घालते. तक्रारीनंतर केवळ नोटीस काढण्याचा फार्स केला जातो. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे कृष्णा प्रदूषणास जबाबदार धरत प्रदूषण नियंत्रण मंडळावर कारवाई करावी. महापालिकेला केलेला ९० कोटींचा दंड रद्द करून तो प्रदूषण नियंत्रण मंडळास करावा. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सांडपाण्याने अंघोळ घालू. असा इशारा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.