Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता शाळेची घंटा वाजणार सकाळी 9 वाजता ; राज्य सरकारने काढला जीआर

आता शाळेची घंटा वाजणार सकाळी 9 वाजता ; राज्य सरकारने काढला जीआर


राज्यभरातील सर्व प्राथमिक शाळांचे वेळापत्रक बदलणार आहे. इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व शाळा यापुढे सकाळी 9 नंतर भरवण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने जीआर काढला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थाचा विचार करुन हा निर्णय घेतला असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.


राज्यभरातील सर्व प्राथमिक शाळांचे वेळापत्रक बदलणार आहे. इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व शाळा यापुढे सकाळी 9 नंतर भरवण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने जीआर काढला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थाचा विचार करुन हा निर्णय घेतला असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याबाबत राज्य सरकारने  सर्व प्राथमिक शाळांना सूचना दिल्या आहेत.

मागील अनेक दिवसांपासून प्राथमिक शाळेची वेळ बदलणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राज्यपालांनी देखील एका भाषणामध्ये शाळेच्या वेळा बदलणार असल्याचे सांगितले होते. लेय शिक्षण मंत्र्यांनी याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले होते. याबाबत आता राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. जीआर काढत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापूर्वी प्राथमिक शाळेची घंटा सकाळी 7 वाजता वाजत होती. प्राथमिक शाळेची वेळ सकाळी लवकरची असल्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नव्हती. परिणामी कोवळ्या वयाच्या विद्यार्थ्यांच्या स्वास्थावर याचा परिणाम होत होता. मुलांची झोप पूर्ण होत नसल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापुढे चौथी पर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 9 नंतरच भरवण्यात येणार आहे.

काय लिहिलं आहे शासनाच्या जीआरमध्ये?

राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचे दिसून येते. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.

पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.

मोसमी हवामान, विशेषता हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते, सकाळी लवकर भरणान्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्याथ्यर्थ्यांसाठी दुस-या सत्राचा विचार करावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.