Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महानगरपालिकेचा 823.28 कोटी रुपये आणि 29.53 लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर

सांगली महानगरपालिकेचा 823.28 कोटी रुपये आणि 29.53 लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन 23 - 24 चां 981 कोटीचा सुधारित आणि सन 24 - 25 चा वार्षिक 
823.28 कोटी रुपये 
29.53 लाख शिलकीचा अर्थसंकल्पास आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यानी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली. यंदाच्या प्रशासकीय अंदाज पत्रक मंजूर करत असताना यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही. 
     
आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या स्थायी सभेत मुख्य लेखाधिकारी अभिजीत मेंगडे यानी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला. यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते.
  
या प्रशासकीय अर्थसंकल्पात ई बससेवा, पर्यावरण  पूरक अंत्यविधी व्यवस्था करणे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, श्वान निर्बीजीकरण व निवारा केंद्र उभारणे, जेष्ठ नागरिकांसाठी विरूंगळा केंद्र उभारणे, खेळाडू दत्तक योजना राबविणे, तृतीय पंथी यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना राबविणे, मॉडेल स्मार्ट स्कूल योजना राबविणे, पर्यावरण अहवाल तयार करणे, ड्रोनद्वारे वृक्ष गणना करणे, ड्रोनद्वारे मालमत्ता सर्व्हेक्षण करणे, सांगलीतील उत्पादनाचे जीओ टॅग करणे, कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेंसिंग लागू करणे, सिटी सर्व्हे क्षेत्राचे सर्व्हेक्षण करणे, सफाई कर्मचारी यांच्यासाठी मॉडेल हजेरी शेड बांधणे, रणगाडा आणि शौर्य स्मारक उभारणे, महापुरुषांचे पुतळे बांधणे आणि परिसर विकास करणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे, मनपाकडून प्रदर्शन केंद्र उभारणे, शेरिनाला sip सहकारी तत्त्वावर पाणी उपसा योजना राबविणे, मनपा हद्दीतील पाणी पुरवठा 58 पंपाचे ऑडिट करणे, राष्ट्रीय नदिकृत योजनेसाठी मनपा हिस्सा देणे, माधवनगर रेल्वे ब्रीज अंडरपास साठी निधी देणे, पत्रकार भवन उभारणे, अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी smkc क्लब उभारणे आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधिंची तरतूद करण्यात आली आहे. हा अंतिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यानी मंजूर केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.