Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर IT Raid; पंख्याला, छतात लपवलेले पेन ड्राइव्ह

नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर IT Raid; पंख्याला, छतात लपवलेले पेन ड्राइव्ह

नाशिक : नाशिकमध्ये आय़कर विभागाने गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. महापालिकेच्या कंत्राटदारांचा यामध्ये समावेश आहे. ८ सरकारी कंत्राटदारांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा टाकला गेला. यासाठी २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करत होते. छाप्यात सुमारे ८५० कोटींहून अधिक बेहिशेबी व्यवहाराची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छाप्यात ६ कोटींची रोकडही जप्त केलीय. ही रक्कम सरकारी व खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवण्यात आली होती. याशिवाय इतरत्र दोन काेटींची रोकड, ३ कोटींचे दागिने, सोन्याची बिस्किटे सापडली. विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहारांची कागदपत्रे कर्मचारी, नातलगांच्या घरी लपवल्याचेही उघड झाले आहे.


छाप्यात आयकर विभागाने मोठ्या शिताफीने व्यवहाराची कागदपत्रे हस्तगत केली. अनेक ठेकेदारांच्या झाडाझडतीत आयकर विभागाला सापडले पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क सापडले आहेत. घराच्या छतात ठेवेलेले पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क सापडल्याचीही माहिती मिळाली. तर एका व्यावसायिकाने थेट घरातील पांख्यालाच 2 जी बी पेन ड्राईव्ह चिकटवला होता. यामध्ये मद्य व्यवसायाच्या शेकडो कोटींच्या व्यवहाराची माहिती होती. या शिवाय एका व्यावसायिकाने तर गाडीत रोकड ठेवून ती गाडी झाडा झुडपात लपवल्याचीही माहिती समोर.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.